Dada Kondke Death Anniversary : दादा कोंडकेंचं राजकीय मंचावर आगमन, मंत्रीपदाची ऑफर ते गूढ मृत्यू; पाहा फोटो!

Chetan Zadpe

जेव्हा दादा कोंडके यांचा उल्लेख होतो तेव्हा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला जातो. दादा आणि ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकालायला मिळतात.

Dada kondke | Sarkarnama

शिवसेनेच्या सभांमधून राजकारण्यांवर दादांनी आपल्या अनोख्या शैलीत टीका केली.

Dada kondke | Sarkarnama

'सोंगाड्या'चित्रपटाच्या निमित्तानं दादा आणि बाळासाहेब भेटले, दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. दादांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबांनी ही मैत्री जपली. पण सक्रिय राजकारणापासून दादा लांबच राहिले.

Dada kondke | Sarkarnama

१९९५ मध्ये शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी दादांना मंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण सक्रिय राजकारण नकोच, म्हणून दादांनी मंत्रीपदाची ती ऑफर नाकारली.

Dada kondke | Sarkarnama

बाळासाहेबांनी दादांना विचारलं की, कोणतं मंत्रिपद हवं? यावर दादांनी बाळासाहेबांना विचारलं की, तुम्ही कोणतं पद घेताय? बाळासाहेब म्हणाले की, मी सेनाप्रमुखच राहणार. यावर दादा म्हणाले, जर तुम्ही सेनाप्रमुखच राहणार असाल तर मग मी देखील शिवसैनिकच राहणार.

Dada kondke | Sarkarnama

कोहिनूर थिएटरच्या मालकाकडे कोंडके यांनी चार आठवडे आधीच थिएटर बुक केले होते. मात्र, तरीही त्याने दादांचा चित्रपट दाखवला नाही. त्यानंतर दादांनी बाळासाहेबांकडे धाव घेतली. आणि ‘सोंगाड्या’ कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला.

Dada kondke | Sarkarnama

गोकुळाष्टमीच्या दिवशी मध्य मुंबईतील नायगाव येथे गिरणी कामगार कुटुंबात दादांचा जन्म झाला. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाल्याने दादांचे नाव कृष्ण ठेवण्यात आले.

Dada kondke | Sarkarnama

१४ मार्च १९९८ दादांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे दादांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर समोर आले की, डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेव्हा अचानकपणे कोंडके यांना त्यांच्या घरी आणण्यात आले होते.

Dada kondke | Sarkarnama
web story | Sarkarnama