Sanjay Raut Political Journey : क्राईम रिपोर्टर ते खासदार ! ठाकरे गटाची धडाडती तोफ संजय राऊतांचा राजकीय प्रवास...

Deepak Kulkarni

जन्म

संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

बी.कॉमची पदवी

वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली आहे.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

क्राईम रिपोर्टर म्हणून वेगळं स्थान...

पत्रकारितेपासून कारकिर्दीची सुरुवात झाली. क्राईम रिपोर्टर म्हणूनही राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

बाळासाहेबांच्या नजरेत भरले...

याचकाळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. दैनिक सामना सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना बोलावून घेतले.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

संपादक ते खासदार...

ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

ठाकरेंच्या तीनही पिढ्यांसोबत काम

बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तीनही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केले आहे.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

महाविकास आघाडीच्या निर्मितीत महत्वाची भूमिका..

2019 च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणाऱ्या दोन नेत्यांपैकी एक होय.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

राजकारणात महत्त्वाची जागा

तेव्हापासून संजय राऊत यांनी शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची जागा काबीज केली आहे.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

आघाडी सरकार कोसळल्यानंतरही हल्लाबोल सुरुच...

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरही राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीकेची तोफ डागणं सुरुच ठेवलं आहे.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

१०४ दिवसांचा तुरुंगवास...

पत्राचाळ प्रकरणात त्यांना ईडीने अटक केल्यानंतर १०४ दिवसांचा तुरुंगवास भोगला होता.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

NEXT : अजय बिष्ट ते आदित्यनाथ, महंत ते बुलडोझर बाबा असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास