मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला : पाहा काही खास क्षणचित्रे...

सरकारनामा ब्यूरो

गेल्या १५ दिवसांच्या सत्तानाट्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरित्या मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या गटाचे काही आमदार आणि भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्वीकारत असतांना त्यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

CM Eknath Shinde & Devendra Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांंच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले असून ते गप्पात रंगले...

CM Eknath Shinde & Devendra Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या...

CM Eknath Shinde & Devendra Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.

CM Eknath Shinde & Devendra Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.

CM Eknath Shinde & Devendra Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मुख्यमंत्री शिंदेंनी सुमारे 40 शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत शिवसेनेसोबत बंडखोरी केली. यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिंदेंनी भाजपच्या समर्थनाने राज्यात सत्ता स्थापन केली असून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Eknath Shinde & Rebel MLAs | Sarkarnama