राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; मनसेचे प्रमुख नेते नॉट रिचेबल : पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सरकारनामा ब्यूरो

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक : भोंगे लावण्याचा प्लॅन बी ठरला..

मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाही आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरु झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्र्यात धडकणार, असल्याचा इशारा मनसेचे ठाणे-पालघर (Thane) जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिला आहे.

Avinash Jadhav | sarkarnama

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे नॉट रिचेबल आहेत, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

bala nandgaonkar | sarkarnama

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) हे तिरुपती बालाजीला रवाना झाले असल्याची माहिती आहे.

Vasant More | sarkarnama

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत, असे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

mumbai police | sarkarnama

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी पुढे याल तर खबरदार; रामदास आठवलेंचा इशारा

Ramdas Athawale | sarkarnama

कोणत्याही आदेशाची वाट बघू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोलिसांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray | sarkarnama