Budget 2023 : ब्रीफकेस ते टॅब्लेट, जाणून घ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

संपूर्ण देशाच्या लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्याच्या सरकारच्या शैलीत गेल्या काही वर्षांत बराच बदल झाला आहे.

Budget 2023 | Sarkarnama

गेल्या तीन वर्षांत केंद्रीय अर्थसंकल्पाचा ब्रीफकेस ते बुककीपिंग आणि नंतर डिजिटली टॅबलेटपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

Budget 2023 | Sarkarnama

2018 पर्यंत देशात अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पाची प्रत म्हणजे ब्रीफकेसमध्ये प्रत घेऊन संसदेत पोहोचायचे. 

Budget 2023 | Sarkarnama

1947 मध्ये, भारताचे पहिले अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी चामड्याच्या पोर्टफोलिओ बॅगमधून बजेट सादर केले होते.

Budget 2023 | Sarkarnama

त्यानंतर, 1970 च्या सुमारास, त्याची जागा हार्डबाउंड बॅगने घेतली, ज्याचा रंग वेळोवेळी बदलत गेला.

Budget 2023 | Sarkarnama

मात्र, 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा बदलली. 

Budget 2023 | Sarkarnama

बजेटची प्रत पारंपारिकपणे वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या बुककेसमध्ये गुंडाळलेली होती. 

Budget 2023 | Sarkarnama

ब्रिटिश अर्थमंत्रीसुध्दा अर्थसंकल्प ज्याप्रमाणे 'ग्लॅडस्टोन' बॉक्समधून सादर करायचे तिच प्रथा आपण पुढे चालवली होती.

Budget 2023 | Sarkarnama

देशात अनेक शतकांपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये बुककीपिंगचा वापर करण्याची परंपरा आहे. परंतु 2020 मध्ये पहिल्यांदा सीतारामन यांनी लेखापुस्तकात अर्थसंकल्प सादर केला होता.

Budget 2023 | Sarkarnama

2021 मध्ये अर्थसंकल्प नव्या स्वरूपात सादर करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या 'डिजिटल इंडिया' मोहिमेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी टॅबलेट द्वारे अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2023 | Sarkarnama

आत्मनिर्भर भारताचा संदेश देण्यासाठी सरकारने 'मेड इन इंडिया टॅब्लेट' सह अर्थसंकल्प सादर केल्याचे सांगण्यात आले होते.

Budget 2023 | Sarkarnama