ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष बोरीस जॉन्सन भारत दौऱ्यावर, पहा फोटो

सरकारनामा ब्युरो

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे गुरूवारी (२१ एप्रिल) दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी भारतात आगमन होताच राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत आणि गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.

या दौऱ्यात दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंध, व्यापार आणि अर्थव्यवस्था, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान बदल अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

आपल्या भेटीदरम्यान बोरीस जॉन्सन यांनी महात्मा गांधी यांच्या हृदय कुंज या निवासस्थानी भेट दिली.

बोरीस जॉन्सन यांना सूत कातण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी चरख्यावर सुतकताई करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना चरख्याची प्रतिकृतीही भेट देण्यात आली.

यावेळी बोरिस जॉन्सन यांनी भारताच्या प्रगतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत आज जगाची फार्मसी बनला आहे आणि माझ्या हातावरची कोरोनाची लसही इथूनच आली आहे. मीही भारताने बनवलेली लस घेतली आहे, त्यासाठी मी भारताचे खूप आभार मानतो.

विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान बोरीस जॉन्सन यांनी हलोल येथील जेसीबी कारखान्यालाही भेट दिली. तिथे ते जेसीबीवर स्वार झाले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.