Birthday Special : शरद पवार यांच्या 'या' इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

अनुराधा धावडे

महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस आहे.

Sharad Pawar Birthday Special

महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपुर्ण देशाच्या राजकारणात एक मुत्सदी राजकारणी, पुरोगामी आणि शेतीतज्ञ अशी शरद पवार यांची ओळख आहे.

Sharad Pawar Birthday Special

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात झाला.

Sharad Pawar Birthday Special

महाविद्यालयीन जीवनातच ते कॉंग्रेसच्या संपर्कात आले, वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

Sharad Pawar Birthday Special

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरुन त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

Sharad Pawar Birthday Special

१९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून निवडून आले.

Sharad Pawar Birthday Special

१८ जुलै १९७८ रोजी पहिल्यांदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरद पवार हे राज्यातील पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

Sharad Pawar Birthday Special

त्यानंतर शरद पवार तब्बल चार वेळा मुख्यमंत्री झाले

Sharad Pawar Birthday Special

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशीही पवारांचे संबध चांगले होते. नरसिंहरावांनी पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिली.

Sharad Pawar Birthday Special

त्यांच्यासमोर गृह, अर्थ आणि संरक्षण असे पर्याय ठेवले. त्यातून शरद पवार यांनी संरक्षण आणि कृषी खात्याची जबाबदारी स्वीकारली.

Sharad Pawar Birthday Special
CTC Images