Bilkis Bano Photos : कोण आहेत बिल्किस बानो? काय घडलं होतं त्यांच्यासोबत?

Chetan Zadpe

बिल्किस बानो या गुजरातमधील बलात्कार पीडित महिला आहे. 2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

बिल्किस बानो यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली होती. आता बिल्किस बानोचे नाव चर्चेत आले. कारण- बिल्किस बानोंवर अत्याचार करून त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्याचा आरोप असलेल्या 11 दोषींना 15 ऑगस्टच्या दिवशी सोडण्यात आले होते.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

बिल्किस बानोच्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची गोध्रा तुरुंगातून सुटका झाली आहे. यामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

2008 मध्ये, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने बिल्किस बानोंवर अत्याचार करणाऱ्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला दोषींना माफीच्या मुद्द्यावर विचार करण्यास सांगितले होते. यानंतर गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुजल मायात्रा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

जन्मठेपेची शिक्षेतील आरोपींना किमान 14 वर्षे तुरुंगवास भोगावा लागतो. 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, दोषी माफीसाठी अर्ज करू शकतो. अशा परिस्थितीत, दोषीचे वय, गुन्ह्याचे स्वरूप आणि कारागृहातील त्याची वागणूक इत्यादींचा आढावा घेतला जातो.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात 20-30 जणांनी बिल्किस बानो आणि तिच्या कुटुंबावर लाठ्या-साखळ्यांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे. बिल्किस बानो आणि चार महिलांवर हल्ला आणि बलात्कार करण्यात आल्याचे आरोपत्रात नमूद आहे.

Bilkis Bano Photos | Sarkarnama

गुजरात राज्य सरकारने बिल्किस आरोपीची शिक्षा माफ केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली होती. यावर नोटीशीला गुजरात सरकारने गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला आपलं उत्तर सादर केलं. यानंतर आज न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Bilkis Bano Photos | Sarkarnama
Web Photo | Sarkarnana