Nana Patole : भंडारा ते दिल्ली; पंतप्रधान मोदींशीही पंगा घेणाऱ्या आक्रमक नानांचा असा आहे राजकीय प्रवास

अनुराधा धावडे

कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आतापर्यंत त्यांनी अनेकदा आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांची नाराजी ओढावून घेतली आहेत.

Nana Patole | Facebook @Nana Patole

1962 मध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात नाना पटोलेंचा जन्म झाला. नागपूरमध्ये महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Nana Patole | Facebook @Nana Patole

1990 मध्ये नाना पहिल्यांदा भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 1999 ते2009 या काळात ते आमदार पदावर राहिले

Nana Patole | Facebook @Nana Patole

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते खासदार झाले.

Nana Patole | Facebook @Nana Patole

पण चार वर्षातच म्हणजे 2018 मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Nana Patole | Facebook @Nana Patole

2019 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातून नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना हार मानावी लागली.

Nana Patole | Facebook @Nana Patole

2019 मध्ये त्यांनी भंडाऱ्यातून निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा आमदार झाले. यावेळीही त्यांना मंत्रीपदाची इच्छा होती. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद घ्यावे लागलं

Nana Patole | Facebook @Nana Patole

नाना पटोले यांनी आपल्या प्रत्येक पदाच्या कार्यकाळात आपला आक्रमकपणा कायम ठेवला. विशेष म्हणजे त्यांनी भाजप मध्ये असताना थेट पंतप्रधान मोदींशीही पंगा घेतला होता.

Nana Patole | Facebook @Nana Patole