Arun Goel: नवीन निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्या!

सरकारनामा ब्युरो

निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Arun Goel | Sarkarnama

अरुण गोयल अनेक वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या.

Arun Goel | Sarkarnama

पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयुक्तपदी अरूण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Arun Goel | Sarkarnama

अरून गोयल हे 1985 च्या बॅचचे पंजाब केडरचे IAS अधिकारी आहेत.

Arun Goel | Sarkarnama

अरूण गोयल यांनी निवृत्तीच्या ४० दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. स्वेच्छानिवृत्तीपर्यंत ते अवजड उद्योग सचिव म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयात काम केले आहे.

Arun Goel | Sarkarnama

दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते 31 डिसेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते परंतु कायद्यानुसार निवडणूक आयुक्त किंवा CEC पद हे वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.

Arun Goel | Sarkarnama

गोयल यांची नियुक्ती गुजरातमधील निवडणुकीच्या काही दिवस आधी झाली आहे, या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात चुरशीची लढत होतांना दिसेल.

Arun Goel | Sarkarnama

कर्नाटक, तेलंगणा आणि नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यांच्या पुढील वर्षीच्या निवडणुका अरूण गोयल यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत.

Arun Goel | Sarkarnama
Sarkarnama