Anil Deshmukh : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांचे असे झाले स्वागत!

सरकारमाना ब्यूरो

कारागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.

Anil Deshmukh | Sarkarnama

अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजवळ व दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते.

Anil Deshmukh, Ajit Pawar | Sarkarnama

तब्बल १३ महिन्यानंतर अनिल देशमुख हे आपल्या कुटुंबीयांना भेटले. त्यामुळे देशमुख कुटुंबीय भावूक झाले.

Anil Deshmukh, Aarti Deshmukh | Sarkarnama

कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत “अनिल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशी घोषणाबाजी केली.  

Anil Deshmukh, Supriya Sule, Jayant Patil | Sarkarnama

तुरुंगातून बाहेर येताच अनिल देशमुख ओपन जीपमधून  वरळीतील आपल्या घरी जाण्यापूर्वी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

Anil Deshmukh and his Family | Sarkarnama

मला खोट्या आरोपांमध्ये गुंतवण्यात आल होतं. अशा मोजक्या शब्दांत देशमुख यांनी भूमिका मांडली.

Anil Deshmukh | Sarkarnama

"सत्तेचा दुरुपयोग कशा प्रकारे केला जातो, याचं उत्तम उदाहरण अनिल देशमुख यांच्यासोबत घडलं आहे." अशा मोजक्या शब्दांत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

Anil Deshmukh, Sharad Pawar | Sarkarnama