अमोल मिटकरींनी पूर्ण केली वडिलांची अंतिम इच्छा

अनुराधा धावडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. मिटकरींनी त्यांच्या शेतात विठ्ठलाचे मंदीर बांधण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.

Amol Mitkari news | Twitter/@Amol Mitkari

नुकतेच त्यांनी शेतातल्या या मंदीराचे फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. वारकरी प्रथा परंपरेनुसार पंढरपूरवरुन वारकऱ्यांच्या उपस्थिती मंदीरासाठी मुर्त्या घडवण्यात आल्या आहेत.

Amol Mitkari photo | Twitter/@Amol Mitkari

''माझ्या बाबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या कष्टाच्या शेतात श्री विठ्ठल मंदिर करण्याचा संकल्प आज पुर्णत्वास गेल्याचे मनस्वी समाधान वाटते. वारकरी सांप्रदायाच्या प्रथे परंपरेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपुर वरून विशेष घडवलेल्या श्री पांडुरंगाच्या मुर्तीची स्थापना केली'' असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

Amol Mitkari latest news | Twitter/@Amol Mitkari

''काही महिन्यांपुर्वी वारकरी सांप्रदायाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद वाटतो. "माझ्या वडिलांची मिरासी गा देवा l तुझी चरणसेवा पांडुरंगा ll "या ओळी शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amol Mitkari latest news update | Twitter/@Amol Mitkari