Anuradha Dhawade
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म झाला. पुण्यातच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले
नंतर त्यांनी जी.एस महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी संपादन केली. पुण्यातच काही काळ त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे घराघरात पोहचले
काही काळातच ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अचानक सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
ऐतिहासिक भूमिकांमुळे नागरिकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला होता.
याच इमेजमुळे मोदी लाटेतही अमोल कोल्हेंनी लोकसभेची निवडणूक जिंकली.
2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे 4 खासदार निवडून आले. यात अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.