एलाॅन मस्क : विक्रमी वेगाने जगात सर्वाधिक श्रीमंत बनलेली व्यक्ती!

सरकारनामा ब्युरो

1. एलॉन मस्क - $288 अब्ज (Elon Musk)

इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे मालक एलॉन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 288 अब्ज डॉलर इतकी आहे. याशिवाय स्पेस एक्स या अंतराळ संशोधन कंपनीचेही ते मालक आहेत.

Elon Musk

2. जेफ बेझोस - $192 अब्ज (Jeff Bezos)

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस या वर्षाच्या मध्यापर्यंत श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते. आता ते जगातील अब्जाधिशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $192 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांनी 1994 मध्ये Amazon कंपनीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात त्यांची कंपनी फक्त पुस्तके विकायची, पण आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे.

Jeff Bezos

3. बर्नार्ड अरनॉल्ट - $163 अब्ज (Bernard Arnault)

जगातील अब्जाधिशांच्या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ते पहिल्या स्थानावर होते, परंतु त्यांच्या कंपनीचे शेअर्स घरणीमुळे श्रीमंतांच्या यादीत ते आता तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट LMVH चे अध्यक्ष आणि CEO आहेत. सध्या त्यांची एकूण मालमत्ता $160 अब्ज आहे. LMVH हा एक लक्झरी ब्रँड आहे जो घड्याळे, कपडे, दागिने, परफ्यूम इत्यादी अनेक महाग उत्पादने बनवतो.

Bernard Arnault

4. बिल गेट्स - $133 अब्ज (Bill Gates)

श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स चौथ्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे सध्या $133 अब्ज एवढी संपत्ती आहे, बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत, याशिवाय गेट्स यांनी इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे पैसे गुंतवले आहेत. जसे- किरकोळ, विज्ञान, ऊर्जा, अभियांत्रिकी इ.

Bill Gates

5. लॅरी पेज - $123 अब्ज (Larry Page)

जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांची सध्या एकूण संपत्ती $123 अब्ज डॉलर इतकी आहे. ज्यामुळे लॅरी पेज हे श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. गुगलने 2006 मध्ये अब्जावधींच्या डीलसह यूट्यूब विकत घेतले, त्याव्यतिरिक्त गुगलचे इतर अनेक तंत्रज्ञान उत्पादने देखील आहेत.

Larry Page

6. मार्क झुकरबर्ग - $122 अब्ज (Mark Zuckerberg)

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे जगातील अब्जाधिशांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. मार्क झुकरबर्ग सध्या एकूण $122 अब्ज डॉलरचे मालक आहेत. फेब्रुवारी 2004 मध्ये त्यांनी फेसबुकची स्थापना केली. याशिवाय मार्कने 2012 मध्ये इंस्टाग्राम आणि 2014 मध्ये व्हॉट्सअॅपची खरेदी केले, ज्यातून ते आज कोट्यावधी रुपये कमवत आहेत.

Mark Zuckerberg

7. सेर्गेय ब्रिन - $118 अब्ज (Sergey Brin)

सेर्गेय ब्रिन हे गुगलचे सह-संस्थापक असून जगातील अब्जाधिशांच्या यादीत ते सातव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 118 अब्ज डॉलर आहे.

Sergey Brin

8. लॅरी एलिसन - $115 अब्ज (Larry Ellison)

संगणक तंत्रज्ञान कंपनी ओरॅकलचे मालक लॅरी एलिसन, $115 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील आठव्या स्थानावरील सर्वातश्रीमंत व्यक्ती आहेत. याशिवाय ते अमेरिकेतील 41 व्या सर्वात मोठ्या बेटाचे मालक आहेत.

Larry Ellison

9. स्टीव्ह बाल्मर - $110 अब्ज (Steve Ballmer)

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांची संपत्ती 110 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जगातील अब्जावधींच्या यादीत स्टिव्ह बाल्मर 9 व्या स्थानावर आहेत.

Steve Ballmer

10. वॉरेन बफेट - $105 अब्ज (Warren Buffett)

बर्कशायर हॅथवेचे चेअरमन आणि सीईओ वॉरेन बफेट यांचेही नाव जगातील 10 श्रीमंतांच्या यादीत आले आहे. सध्या त्यांची संपत्ती 105 अब्ज डॉलर इतकी आहे आणि ते जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये त्यांचे नाव येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warren Buffett