Maharashtra State Song : ६२ वर्षांनी मिळालं महाराष्ट्राला 'राज्यगीत'; कुणी लिहिले हे गीत?

सरकारनामा ब्यूरो

मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.

Maharashtra State Song | Sarkarnama

'महाराष्ट्र गीत' अशी ओळख असलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा…' हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात हे गीत गायलं आहे.

Maharashtra State Song | Sarkarnama

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनी महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. 

Maharashtra State Song | Sarkarnama

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गीताला राज्यगीताचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

Maharashtra State Song | Sarkarnama

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये हे गीत वाजवले जाणार आहे.

Maharashtra State Song | Sarkarnama

राज्यगीत गातांना हे नियम लागू केले आहेत. राज्यगीत सुरू असतांना सावधान स्थितीत उभे राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Maharashtra State Song | Sarkarnama

जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व दिव्यांग नागरिकांना उभे राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Maharashtra State Song | Sarkarnama