Aadesh Bandekar : अभिनेता ते ठाकरेंचे निष्ठावंत; पाहा त्यांची राजकीय कारकिर्द!

सरकारमाना ब्यूरो

'झी' मराठीवर गाजलेल्या ‘होममिनिस्टर’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहचलेले लाडके भावोजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर (18 जानेवारी ) ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

Aadesh Bandekar | Sarkarnama

आदेश बांदेकर अभिनेते आणि निवेदकासोबतच, शिवसेना पक्षाचे सदस्य आणि सचिव आहेत.

Aadesh Bandekar | Sarkarnama

बांदेकर यांनी सप्टेंबर 2009 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करत, 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम सूरू ठेवले.

Aadesh Bandekar | Sarkarnama

2018 मध्ये मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे ते अध्यक्ष झाले. तसेच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्य सरकारकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता.

Aadesh Bandekar | Sarkarnama

बांदेकर हे शिवसेनेत सक्रिय असल्याने २०१२ मध्ये त्यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

Aadesh Bandekar | Sarkarnama

 बांदेकरांनी वेळोवेळी पक्षासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Aadesh Bandekar | Sarkarnama

आदेश बांदेकर यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर देखील मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. या दोघांची जोडी मनोरंजन विश्वात खूप प्रसिद्ध आहे.

Aadesh Bandekar | Sarkarnama

या दोघांची लव्हस्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे. पळून जाऊन लग्न केले होते.

Aadesh Bandekar | Sarkarnama