Navneet Kaur Rana : अभिनेत्री ते अमरावतीच्या खासदार; नवनीत राणांची अशी आहे राजकीय कारकीर्द

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत

खासदार नवनीत राणा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आहेत.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आव्हान

2022 मध्ये राणा दाम्पत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'या निवासस्थाना समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

सामुहिक हनुमान चालीसा पठण

नवनीत राणांनी आता हनुमान जयंतीनिमित्त 21 वेळा सामुहिक हनुमान चालीसा पठण करण्याचा सकल्प केल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

करिअरची सुरुवात

नवनीत राणांचा जन्म मुंबईत झाला. बारावीनंतर त्यांनी मॉडलिंगला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

20 पेक्षा जास्त चित्रपटात काम

नवनीत राणांनी आतापर्यंच 20 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. त्यांना मराठी, पंजाबी, हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषा येतात.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

रवी राणांशी विवाह

2011 मध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात रवी राणा यांच्याशी नवनीत राणा यांनी विवाह केला.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

राजकारणात ओळख निर्माण केली

नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत. त्यांनी आधी अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्या राजकारणात आल्या.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

2014 ला पहिल्यांदा निवडणूक लढवली

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमरावतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

2019 च्या निवडणुकीत दणदणीत विजय

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आणि विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

संसदेत उत्तम पद्धतीने प्रश्न मांडतात

नवनीत राणा या एकेकाळी अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर झळकायच्या. आता त्या संसदेमध्ये तितक्याच उत्तम पद्धतीने आपल्या मतदारसंघामधील प्रश्न मांडताना दिसतात.

Navneet Kaur Rana | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना 'पद्म पुरस्कार' प्रदान ; पाहा खास फोटो!