Ramraje Naik-Nimbalkar : नगराध्यक्ष ते विधानपरिषदेचे सभापती; असा आहे रामराजे नाईक निंबाळकरांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्युरो

७५ वर्षे पूर्ण

फलटण येथील राजघराण्याचे रामराजे नाईक-निंबाळकर ८ एप्रिल २०२३ रोजी आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

प्राध्यापक म्हणून सुरुवात

एलएल. एम. ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर फलटणच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी वाहून घेतले.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

फलटणचे नगराध्यक्ष

फलटण पंचायत समितीचे सदस्य, सातारा जिल्हा परिषद सदस्य, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

तीन वेळा आमदार

सन १९९५ ते २००९ असे सलग तीन वेळ ते विधानसभेवर निवडून गेले.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

विधानपरिषदेचे तीन वेळा सदस्य

सन २०१० ते २०२२ असे तीन वेळा ते विधानपरिषदेवर निवडून आले आहेत.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

सांभाळली विविध खाती

कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, महसूल आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

दोनदा सभापती

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी त्यांची दोन वेळा बिनविरोध निवड झाली.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

महत्वपूर्ण उपक्रम राबविले

मार्च २०१५ ते जुलै २०२२ या सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी विधानमंडळात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

Ramraje Naik-Nimbalkar | Sarkarnama

NEXT : प्रतिभा पाटील यांच्यानंतर लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती