IFS Arushi Mishra : 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण ! 'आईएफएस' आरुषी मिश्रा

Rashmi Mane

आरुषी मिश्रा

उत्तर प्रदेशची आरुषी मिश्रा यांनी 'यूपीएससी'च्या 'इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस' परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला. मात्र, त्यानंतरही आरुषी थांबली नाही आणि मेहनतीच्या जोरावर ती ISF बनली.

Arushi Mishra | Sarkarnama

आरुषी मिश्राची यशोगाथा

उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या आरुषी मिश्रा अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना 10वीत 95.14 टक्के आणि 12वीत 91.2 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी 'आयआयटी' रुरकी येथून 'बीटेक'चे शिक्षण घेतले.

Arushi Mishra | Sarkarnama

'बी.टेक' नंतर 'यूपीएससी'ची तयारी

2014 मध्ये 'बीटेक' उत्तीर्ण झाल्यानंतर आरुषी यांनी 'यूपीएससी'ची तयारी सुरू केली आणि भारतीय वनसेवा परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.

Arushi Mishra | Sarkarnama

IFS आरुषी

UPSC नागरी सेवा परीक्षा 2018 च्या भारतीय वन सेवा (IFoS) परीक्षेत, IFS आरुषी मिश्रा हिने 229 वा क्रमांक मिळविला. यानंतर त्यांना 'आयआरएस'चे पद मिळाले.

Arushi Mishra | Sarkarnama

'यूपीपीसीएस'

मिश्रा यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPPCS परीक्षा) 16 वा क्रमांक मिळविला होता, त्यानंतर त्यांना 'डीएसपी' पद देखील मिळाले. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा 'यूपीएससी' नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.

Arushi Mishra | Sarkarnama

यशाचे रहस्य

आरुषी म्हणतात तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. वेबसाइटवरील साहित्य आणि माहितीपूर्ण YouTube व्हिडिओ वापरून नोट्स बनवा. तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज 30 मिनिटे व्यायाम आणि योगासने करा आणि शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या.

Arushi Mishra | Sarkarnama

Next जाणून घ्या, गेली 'तीन दशक' प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या ; IAS सुजाता सौनिक यांच्याबद्दल...