Anuradha Dhawade
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदविका प्राप्त केली आहे.
जयंत पाटील यांनी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पूर्ण केले आणि त्यानंतर ते न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले. दुर्दैवाने 1984 मध्ये राजारामबापू पाटील यांचे आकस्मिक निधन झाल्याने जयंत पाटील यांना अमेरिकेतून परतावे लागले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. 1967 मध्ये पदवीनंतर, त्यांनी जर्मनीमध्ये युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळवली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली.
विश्वजित कदम यांनी इंजिनियरिंग केलं आहे शिवाय त्यांची व्यवस्थापन शास्त्रात एमबीए, पीएचडी झाली आहे. इतकंच नाही तर हॉवर्ड विद्यापीठातून शैक्षणिक क्षेत्रातील व्यवस्थापन आणि नेतृत्व यात त्यांनी पदवी प्राप्त केली आहे.
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी K.L.E सोसायटीचे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातून, M.B.B.S., M.S. (जनरल सर्जरी), एम.सी.एच. (न्यूरोसर्जरी) पदवी मिळवली आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातील दयानंद कॉलेज मधून कला विषयात पदवी मिळवली आहे. तर मुंबई विद्याापीठातून आयएलएस लॉ कॉलेज आणि न्यू लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली असून हजारिमल जोमानी महाविद्यालयातून व्यवसाय व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर पदवी (MBA) प्राप्त केली आहे
आमदार आदित्य ठाकरे यांनी 2015 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या के.सी. लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाशिकच्या N.D.M.V.P च्या मेडिकल कॉलेजमधून MBBS ची पदवी मिळवली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून M.S. केलं आहे.