IAS Priyanka Goel : 'मॉडेलपेक्षा' कमी नाहीत या 'आयएएस' अधिकारी...

Rashmi Mane

प्रियंका गोयल

खर तर UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे अजिबात सोपे नाही. दोन- तीन प्रयत्न करूनही उमेदवारांना यश मिळत नाही. परंतू, प्रचंड मेहनतीच्या बळावर प्रियंका गोयल यांनी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

Priyanka Goel | Sarkarnama

दिल्लीच्या रहिवासी

दिल्लीच्या रहिवासी असलेल्या प्रियांकांसाठी UPSC चा प्रवास खूप कठीण होता. मात्र, त्या कठीण काळातही हार न मानता आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या.

Priyanka Goel | Sarkarnama

शिक्षण

प्रियांका गोयल यांनी पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडेल शाळेमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून शिक्षण घेतले.

Priyanka Goel | Sarkarnama

सहा वेळा प्रयत्न

प्रियंका गोयल यांनी 'यूपीएससी' परीक्षेसाठी सहा वेळा प्रयत्न केले होते.

Priyanka Goel | Sarkarnama

अधिकारी बनण्याचा प्रवास अत्यंत कठीण

प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांचा 'यूपीएससी' परीक्षेचा प्रवास खूप कठीण होता. ती कधी यशस्वी होईल की नाही हे देखील त्यांना माहित नव्हते.

Priyanka Goel | Sarkarnama

अभ्यासक्रमाची योग्य माहिती

'यूपीएससी' परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात प्रियंका गोयल यांना अभ्यासक्रमाची योग्य माहिती नव्हती. यामुळे त्या प्रिलिमही क्लिअर करु शकल्या नाही.

Priyanka Goel | Sarkarnama

पाच वेळेस अपयश

दुसऱ्या प्रयत्नात त्यांना ०.७ गुणांनी कट ऑफ लिस्टमधून स्थान गमवावे लागले. तिसर्‍या प्रयत्नात 'यूपीएससी' मुख्य परीक्षा नापास झाल्या. चौथ्यांदा त्या CSAT मध्ये मागे राहिल्या. पाचव्या प्रयत्नाच्यावेळी कोविड काळ होता ; त्यांच्या आईच्या 80% फुफ्फुसांना नुकसान झाले होते. त्यामुळे त्या प्रिलिम्स क्लिअर करू शकल्या नाही.

Priyanka Goel | Sarkarnama

यश

अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्या २०२२ च्या 'यूपीएससी' परीक्षेत ३६९ वा क्रमांक मिळविला.

Priyanka Goel | Sarkarnama

Next : जाणून घ्या ; देशाच्या पहिल्या महिला 'आयएएस' अधिकारी