कुठलीही जातीय भावना दुखावली जाणार नाही, याची काळजी घेतलीय!

महाराजांना हाल हाल करून मारल्याचे आम्ही पाहू शकत नाही, त्यामुळे तो प्रसंग दाखवू नये असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.https://t.co/igGpsUlNKT— MySarkarnama (@MySarkarnama) February 20, 2020
amol kolhe will discuss with arjun khotkar on sambhaji serial
amol kolhe will discuss with arjun khotkar on sambhaji serial

पुणे: 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचे निर्माते आणि संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे हे मालिकेच्या वादासंबंधी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा करणार आहेत.

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका काही दिवसांत संपणार आहे. मालिकेत सद्या संभाजी महाराजांना पकडल्याचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. यात पुढे महाराजांचा मृत्यू आहे. यासंबंधाने आज खोतकर यांनी आपली भुमिका मांडली आहे. संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्याचे आम्ही पाहू शकत नाही, त्यामुळे तो प्रसंग दाखवू नये असे त्यांनी म्हटले आहे. 

त्यासंदर्भाने अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, मालिकेतील चित्रीकरणामुळे कुठलीही जातीय भावना दुखावली जाणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. संभाजी महाराज यांचा इतिहास जनतेला कळायला हवा. या विषयावर राजकारण होवू नये अशी आमची अपेक्षा आहे. अजून खोतकर यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com