अमोल कोल्हेंनी मानले राज ठाकरे यांचे आभार

अमोल कोल्हेंनी मानले राज ठाकरे यांचे आभार

मुंबई : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली असताना आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे कॉंग्रेस आघाडीसोबत जाण्याच्या शक्‍यतेमुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत राज यांच्या सभांचा चांगला इम्पॅक्‍ट झाल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली, असे कोल्हे यांनी यावर सांगितले.

लोकसभा निवडणुकीत युती सराकारच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली. डॉ. अमोल कोल्हे हे 58483 मतांनी विजयी झाले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ माळी समाजाचीही लक्षणीय संख्या आहे. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असल्याने मराठा समाजासह सर्वच समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे कोल्हे यांनी शिरूरचा गड काबीज केल्याचे मानण्यात येते. कॉ. अमोल कोल्हे यांनी राज यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com