Amol Kolhe Meets Raj Thakare | Sarkarnama

राज ठाकरे - अमोल कोल्हे यांची केवळ सदिच्छा भेट की पुढच्या गणितांची चर्चा?

मिलिंद तांबे
बुधवार, 12 जून 2019

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसला सोबत घ्यावे अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसची असून, राज ठाकरे यांचा फायदा लोकसभेला जरी झाला नसला तरी विधानसभेला नक्कीच होईल असे राष्ट्रवादीला वाटत आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज अमोल कोल्हे यांच्या भेटीने पुन्हा एकदा मनसे राष्ट्रवादी सोबत जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

मुंबई : जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून,भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. दरम्यान अमोल कोल्हे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसला सोबत घ्यावे अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसची असून, राज ठाकरे यांचा फायदा लोकसभेला जरी झाला नसला तरी विधानसभेला नक्कीच होईल असे राष्ट्रवादीला वाटत आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज अमोल कोल्हे यांच्या भेटीने पुन्हा एकदा मनसे राष्ट्रवादी सोबत जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

राज ठाकरे फॅक्टरचं आघाडीवर गारुड
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका करत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने भूमिका घेतली होती.राज यांच्या सभांचा फायदा आघाडीला फारसा झाला नसला तरी राज यांच्या सभांमुळे चांगली वातावरण निर्मिती झाली होती.शिवाय मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आघाडीचा चांगला प्रचार ही केला.यामुळे राज यांच्यावर खुश असणाऱ्या आघाडीच्या नेत्यांचा राज यांनी विधानसभा निवडणुकीत ही आघाडी सोबत यावं असा सूर आहे.यामुळे निवडणुकीतील अपयशानंतर ही खुद्द शरद पवार,अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. भाई जगताप,माणिकराव ठाकरे यांच्यानंतर अमोल कोल्हे यांनी राज यांची भेट घेतली. या भेटीबाबत राज यांची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख