विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं ठरलंय अन्‌ वातावरणच फिरलंय : अमोल कोल्हे

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं ठरलंय अन्‌ वातावरणच फिरलंय : अमोल कोल्हे

नगर : "विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं ठरलंय अन्‌ वातावरणच फिरलंय अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांच्या मागे उभे राहण्याचे लोकांनी ठरविले आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी'चे उमेदवार संग्राम यांच्या विजयाची पुन्हा एकदा नांदी लागणार आहे. नगर शहरासाठी संग्राम जगतापच विकासाभिमुख चेहरा ठरेल,'' असा ठाम विश्‍वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला . 

''महाराष्ट्रातील किल्ले लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय होतो. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली मते मागणारे शिवसेनेचे मंत्री मूग गिळून बसतात. त्यामुळे शिवसेनेने मत मागण्यांचा नैतिक अधिकार गमावला आहे,'' असा टोलाही कोल्हे यांनी लगावला आहे.

माळीवाडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आमदार अरुण जगताप व राहुल जगताप, शहराध्यक्ष माणिक विधाते, बाबासाहेब गाडळकर, शारदा लगड, उबेद शेख, निखिल वारे, अविनाश घुले, गणेश भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, "शहरात शिवसेनेच्या उमेदवाराने 25 वर्षे सत्ता भोगली. विकासाचे कोणतेच व्हीजन त्यांच्याकडे नसल्याचे सर्वांनी पाहिले. दुसरीकडे, संग्राम हा पोटाच्या भाकरीचा विचार करणारा विकासाचा चेहरा आहे.''

विरोधकाला राजकारणातून 'टाडा' लावा
"विरोधक म्हणतात, नगरमधील गुंडगिरी, दहशतवाद संपला पाहिजे. ज्यांच्यावर सर्वांत पहिला 'टाडा' लागला, ते दहशतवाद संपविण्याची भाषा करतात, अशांना राजकारणातून 'टाडा' लावण्याची गरज आहे,'' अशी टीका संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com