बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी अध्यादेश काढावा- डॉ. अमोल कोल्हे 

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी (ता. २४) संसदेत पहिल्याच भाषणात महाराष्ट्रासह देशातील आत्महत्याग्रसत्‍ व दुष्काळाने प्रभावीत शेतक-यांचे प्रश्न मांडले. तसेच राज्यात बंद पडलेली बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली.
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी अध्यादेश काढावा- डॉ. अमोल कोल्हे 

मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी (ता. २४) संसदेत पहिल्याच भाषणात महाराष्ट्रासह देशातील आत्महत्याग्रसत्‍ व दुष्काळाने प्रभावीत शेतक-यांचे प्रश्न मांडले. तसेच राज्यात बंद पडलेली बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली. संसदेचे अर्थसंकंल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर डॉ. कोल्हे यांनी शेतमालाचे उत्पादन व शेती मालाला मिळणारा दर यातील तफावत व त्यामुळे शेतक-यांवर ओढवलेले संकट, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मांडला. राज्यातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबविण्याच्या दृष्टीने शासनाने योजना आखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत मुददा उपस्थित करून यासंदर्भात अध्यादेश काढण्याची  मागणी यावेळी केली. ते म्हणाले, "महाराष्ट्राला गेल्या चारशे वर्षांची बैलगाडा शर्यतीची समृध्द पंरपरा लाभली आहे. 2011 पासून बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत ही नुसते मनोरंजनाचे साधन नसून ग्रामीण भागातील अर्थकारण यावर अवलंबून आहे. बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो. गाव खेडयांची संस्कृतीही जपली जाते. खिलार जातीचे बैल प्रामुख्याने बैलगाडा शर्यतीकरिता वापरले जातात. शर्यत बंद झाल्यामुळे गोवंशाचा महत्वाचा भाग असणा-या खिल्लार जातीच्या बैलांना कत्तलखान्यात पाठवण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. ही स्थिती बघता संस्कृती-परंपरेचे रक्षण,  ग्रामीण अर्थकारण व गोवंश रक्षणाकरिता बैलगाडा शर्यत सुरु करण्यात यावी. त्यासाठी अध्यादेश आणावा."

आदिवासी भागात वनौषधींवरील संशोधन केंद्र सुरु व्हावे
खेड, आंबेगाव व जुन्नर या तीन तालुक्यांमध्ये आदिवासी जमातींची संख्या मोठया प्रमाणात आहे. या समाजाची उपजिवीका ही वनौषधींवर अवलंबून आहे. वनौषधींवरील संशोधन केंद्र सुरु व्हावे. या माध्यमातून शास्त्रीय पध्दतीने वनौषधी सामान्य लोकांपर्यत पोचाव्या व आयुर्वेदात त्यांचा उपयोग व्हावा. आदिवासी भागात बंद पडलेले बिएसएनएल टॉवर कार्यान्वीत करण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com