`स्वराज्यरक्षक संभाजी`, शरद पवार आणि अमोल कोल्हे

`स्वराज्यरक्षक संभाजी`, शरद पवार आणि अमोल कोल्हे

पुणे : मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खासदार असलो; तरी माझी भूमिका असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही, त्यामुळे मालिकेतील कोणता भाग-दाखवायचा आणि कोणता नाही ? हे कधी ठरत नाही, असे अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी स्पष्ट केले. परंतु, मालिका आणि त्याबाबत काही अडचणी आहेत का ? याची पवारसाहेब अस्थेने विचारपूरस करतात, असे सांगून, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडणारी ही मालिका सुरूच राहील, असेही त्यांनी आर्वजून सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या डॉ. कोल्हे यांच्या `स्वराज्यरक्षक संभाजी` या मालिकेबाबत सोशल मिडियात आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करण्यात येत आहे. या मालिकेत पवार यांचा हस्तक्षेप असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी आपली भूमिका मांडून सोशल मीडियातून होणारे आरोप फेटाळून लावले आणि त्या मजकुरावरच आक्षेप नोंदविले.

डॉ. कोल्हे म्हणाले, ""स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात "सोशल मीडिया'वरील चर्चा निंदनीय आहे. त्यातील पवार यांच्या नावाचा उल्लेखही चुकीचा आहे. या मालिकेत काय असावे ? नसावे ? यावर पवार यांनी काहीच मत मांडले नाही. त्यामुळे या मालिकेचे भाग आणि पवार यांची चर्चा खोटी आहे. दुसरीकडे, संभाजी महाराज सगळ्यांपर्यंत पोचविण्यासाठी स्वराज्यरक्षक मालिका सुरूच राहणार आहे. यासंदर्भातील अफवांवर विश्‍वास ठेवू नये.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com