बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवणार - कोल्हे

बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासह पुणे-नाशिक आणि पुणे-नगर हायवेची कोंडी मार्गी लावण्याचा प्रयत्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज (ता.१७) `सरकारनामा'ला सांगितले.
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवणार - कोल्हे

पिंपरीः बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासह पुणे-नाशिक आणि पुणे-नगर हायवेची कोंडी मार्गी लावण्याचा प्रयत्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज (ता.१७) `सरकारनामा'ला सांगितले. 

खासदार होताच संसदेच्या पहिल्याच अर्थसंकल्पी अधिवेशनात डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या या पहिल्याच शैलीदार भाषणाची व वक्तृत्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत कौतूक केले होते.

उद्यापासून (ता.१८) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यात बैलगाडा शर्यतीचा फॉलोअप सुरुच ठेवून शिरूरच नाही,तर राज्यातील शेतकऱ्यांच्या हौसेचा हा प्रश्न मार्गी कसा लागेल, हे पाहणार आहे, असे डॉ. खा. कोल्हे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सांगितले. 

सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या(एनएचएआय)वादात सापडल्याने खोळंबलेल्या व त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी जटील करणाऱ्या पुणे-नाशिक हायवेच्या सहापदीकरणावरही (नाशिक फाटा ते चांडोली) तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,असे ते म्हणाले. 

या महामार्गाचे खेड घाट व नारायणगाव येथील बायपास मार्गी लागले असून खेडघाटातील काम,तर सत्तर टक्के पूर्ण झाले आहे. नारायणगावचे काम प्रगतीपथावर आहे.आता मंचर व खेडमधील बायपासचे टेंडर काढून मार्गी लावण्याकरिता पाठपुरावा करणार असून त्यातून हा हायवे काहीसा मोकळा श्वास घेईल,असे त्यांनी सांगितले.

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीवरही असाच उतारा काढायचा आहे.त्यासाठी त्याच्या रुंदीकरणाकरिता डीपीआर सल्लागार तातडीने नेमण्याची मागणी करणार आहे. त्याचा पाठपुरावा यापूर्वीच केंद्रीय रस्ते व हायवेमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुरुही केला असल्याची माहिती खा.कोल्हे यांनी दिली.त्याजोडीने पिंपरी-चिंचवडमधील रेडझोनच्या ज्वलंत गंभीर प्रश्नाचा फॉलोअप राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com