भ्रष्टाचारी मंत्र्यांना क्‍लिनचीट हाच मुख्यमंत्र्यांचा मोठा घोटाळा - अमोल कोल्हे

  भ्रष्टाचारी मंत्र्यांना क्‍लिनचीट हाच मुख्यमंत्र्यांचा मोठा घोटाळा - अमोल कोल्हे

घनसावंगी : महाराष्ट्रातील युती सरकारच्या 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढूनही मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना क्‍लिनचीट देण्यात आली आहे. मुळात मुख्यमंत्र्यांनी अशी क्‍लिनचीट देणे हाच मोठा घोटाळा असल्याची टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. शिवस्वराज्य यात्रा शनिवारी घनसावंगी तालुक्‍यात होती. यावेळी त्यांनी राज्यातील युती सरकारवर कडाडून हल्ला चढवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. शनिवारी घनसावंगी या आमदार राजेश टोपे यांच्या मतदारसंघात ही यात्रा आली होती. 

यावेळी आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करतांना कोल्हे म्हणाले, सेना-भाजप युतीने मागील निवडणुकीच्या आधी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ही जाहिरात करून सत्ता हस्तगत केली. मात्र पाच वर्षात राज्यभरात 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, दिवसाला पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करता आहेत. तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला या सरकारला तीन वर्षे लागली. राज्यात 16 हजार बलात्काराच्या घटना, 37 हजार विनयभंगाचे प्रकार घडल्याने खऱ्या अर्थाने या सरकारलाच "आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असा जाब विचारण्याची वेळा आली आहे. 

पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या या सरकारच्या पाच वर्षात चिक्की, एमआयडीसी, भूखंड या सारखे अनेक घोटाळे धनंजय मुंडे यांनी बाहेर काढले. पुराव्यानिशी 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून देखील त्यांना मुख्यमंत्र्याकडून क्‍लिनचीट दिली गेली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा क्‍लीनचीट घोटाळाच मोठा असल्याचा टोला अमोल कोल्हे यांनी यावेळी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com