खा.कोल्हेंचे पक्षबांधणीत लक्ष, संघटनेत मोठे पद मिळणार?

 खा.कोल्हेंचे पक्षबांधणीत लक्ष, संघटनेत मोठे पद मिळणार?

पिंपरी : गेले ते गेले, त्यांचा विचार न करता पक्ष वाढवा, नवीन लोकांना पक्षात सामावून घ्या, असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. फर्डे वक्ते आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा गुण असलेले खा.कोल्हे यांनी पक्ष संघटनेत लक्ष घातल्यामुळे लवकरच संघटनेत त्यांना मोठे पद मिळणार असल्याचे संकेत शहराच्या भेटीत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मिळाले आहेत. तसे सुतोवाचही पक्षाचे नेते अजित पवार यांनी यापूर्वीच केले आहे. 

शरद पवार आणि अजित पवार यांच्यानंतर खा.कोल्हेंच्या भेटीतच शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटलेले दिसले. त्यांची मोठी क्रेझ कार्यकर्त्यांतच नाही,तर पदाधिकाऱ्यांतही दिसून आली. खासदार झाल्यानंतर प्रथमच शहरात आलेल्या खा. कोल्हे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नी पालिका प्रशासनाची झाडाझडती घेतली. त्यानंतर रात्री पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. 

नेते पक्ष सोडून गेल्याने धक्का बसलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी धीर दिला. त्या धक्‍यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही,तर ते गेले ते स्वार्थासाठी, कार्यकर्त्यांसाठी नाही. कार्यकर्ते पक्षात कायम आहेत.यामुळे गेलेल्यांचा विचार न करता पक्षाचे विचार आणि पक्ष वाढवा. नवे कार्यकर्ते कसे जोडता येतील हे पहा, तरुणाई सोशल मिडियाचा वापर करते. पण,त्याचा वापर न करणाराही एक घटक आहे. त्याला लक्ष्य करा. मित्रमंडळीशी चर्चा करून दहा माणसं जॉईन कशी होतील, हे पहा असे प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन त्यांनी केले. कामे करूनही ती सांगायला कमी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.पुन्हा युती सरकार येईल म्हणून काही पक्ष सोडून भाजप,शिवसेनेत गेले आहेत. कारण त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही,असा समाचार त्यांनी आऊटगोईंग केलेल्यांचा घेतला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com