आढळरावांच्या सभांना गर्दी नसल्याने रोजंदारीने माणसे : कोल्हे यांची टीका

आढळरावांच्या सभांना गर्दी नसल्याने रोजंदारीने माणसे : कोल्हे यांची टीका

मंचर : "शिरूर लोकसभा मतदारसंघातील विरोधी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सभांना गर्दी होत नसल्याने रोजनदारीने लोकांना जमा करावे लागते. निवडणूक निकालाचा अंदाज आल्यामुळे त्यांच्याकडून व कार्यकर्त्यांकडून अत्यंत खालच्या पातळीवर वैयक्तिक स्वरुपाची टीका केली जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला.

त्यांच्या टीकेमध्ये काहीच तथ्य नाही. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या फौजा उतरविल्या जात आहेत. पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नाराज असलेल्या जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे.'' असे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

 
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, निघोटवाडी, मंचर येथे झालेल्या कोपरा सभामध्ये डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, डॉ. नरेंद्र काळे, देवेंद्र शहा, शंकरराव पिंगळे, डॉ. सुदाम खिलारी, बाळासाहेब पिंगळे, मारुती डोके, सरपंच नवनाथ निघोट यांच्यासह शेतकरी, डॉक्टर, व्यापारी उपस्थित होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, "मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क कार्यालय सुरु करून सामन्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. मला भेटण्यासाठी मध्यस्थीची गरज लागणार नाही. संसदेत वैद्यकीय व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे.''

 
वळसे पाटील म्हणाले, "डॉ. कोल्हे यांचे प्रत्येक गावातून जल्लोषात स्वागत केले जात आहे. भर उन्हात व रात्री उशिरापर्यंत युवक व महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. गेल्या 15 वर्षात जनतेचा विद्यमान खासदारांकडून भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्यावर जनतेचा रोष आहे. डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून मतदार संघातील प्रश्नांना न्याय मिळेल. असा विश्वास जनतेत आहे. डॉ. कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने जनतेने विजयी करावे.'' 
 नवनाथ निघोट, शिवाजीराव निघोट, सचिन काजळे, डॉ. सुहास कहडणे आदींची भाषणे झाली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com