amit shaha praises baburao pacharene | Sarkarnama

अमित शहादेखील खूष होऊन म्हणाले, मान गएं बाबूरावजी आप को!

नितीन बारवकर
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

शिरूर ः भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिरूर- हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ रविवारी शहरात रोड शो केला. या रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मोठ्या संख्य़ेने लोक यात सहभागी झाले होते. ती संख्या पाहून शहा खूष जाले आणि पाचर्णे यांचे कौतुक केले. `मान गए बाबूरावजी आप को. बहोत अच्छा नियोजन था. आप के विजयी रॅली में जरूर आऊं गा, अशा शब्दांत त्यांनी या रॅलीच्या नियोजनाबद्दल पाठीवर थाप मारली. 

शहा, पाचर्णे यांच्यावर पुष्पवृष्टी
शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे - नगर रस्त्यावर या रोड शोदरम्यान, ठिकठिकाणी अमित शहा व आमदार पाचर्णे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. बाजार समिती, अण्णा भाऊ साठे चौक, बस स्थानक, हुतात्मा चौकमार्गे विद्याधाम प्रशालेजवळ रॅलीची सांगता झाली.

डी फार्मसी कॉलेजच्या मैदानावर शहा यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर, श्री संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस संदीप भोंडवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष नीलेश जाधव, गणेश सातव, गोरक्ष काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, आमदार पाचर्णे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर रोड शोला सुरवात झाली. या रोड शोसाठी खास रथ तयार करण्यात आला होता. रथावर अमित शहा व आमदार पाचर्णे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, शिरूर तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, शहर अध्यक्ष केशव लोखंडे आदीं उपस्थित होते. ढोल ताशा, झांज, गजीनृत्याच्या गजरात निघालेल्या या रॅलीत भाजप, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटना, लहूजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख