amit shaha in karnataka | Sarkarnama

अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

बंगळूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (ता. 17) कर्नाटकच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात होणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध व मंत्रिमंडळ विस्ताराचा रेंगाळलेला प्रश्न, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांच्या या भेटीला महत्त्व आले आहे. ते किती वाजता कर्नाटक दौऱ्यावर येणार, याची अधिकृत वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. पण, शुक्रवारी येथील आरमने मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. सायंकाळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची ते भेट घेणार आहेत. हुबळी येथे शनिवारी (ता.

बंगळूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (ता. 17) कर्नाटकच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात होणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध व मंत्रिमंडळ विस्ताराचा रेंगाळलेला प्रश्न, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांच्या या भेटीला महत्त्व आले आहे. ते किती वाजता कर्नाटक दौऱ्यावर येणार, याची अधिकृत वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. पण, शुक्रवारी येथील आरमने मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. सायंकाळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची ते भेट घेणार आहेत. हुबळी येथे शनिवारी (ता. 18) नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी शहा यांचे येथील एका खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य राहणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख