अमित शहा, तुम्ही मला काय उखडून टाकणार? : शरद पवार

अमित शहा, तुम्ही मला काय उखडून टाकणार? : शरद पवार

पुणे : देशाचे निम्मे मंत्रीमंडळ बारामतीत प्रचाराला येऊन गेले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीत येऊन राष्ट्रवादीला उखडून फेकण्याची भाषा बोलली. तुम्ही मला काय उखडून टाकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचेे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला आव्हान दिले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी इंदापूर येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. काॅंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे, सुप्रिया सुळे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार यांनी भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्राची माहिती नसल्याचा आरोप करत गुजरातमधील अनेक शेठजी येथे येऊन गेले तरी फरक पडणार नसल्याचे सांगितले. अमित शहा यांनी दिलेल्या आव्हानाचा तिरकस भाषेत समाचार घेत येथे येऊन ही भाषा वापरणे जनतेला रूचले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीतील मतदारसंघातील प्रचार संपल्यानंतर शरद पवार यांना येथे थांबू देऊ नका, अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती. तिलाही पवार यांनी प्रत्युत्तर दिले. माझे नाव बारामतीच्या मतदार यादीत नाही, हे खरे आहे. पण मतदार यादीत नाव नसले म्हणून थांबून द्यायचे नाही ही काय मोगलाई आहे का, असा सवाल त्यांनी केला.

हर्षवर्धन पाटील यांनी बारामती तालुक्यापेक्षा अधिक लिड सुप्रिया सुळे यांना देण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com