amit shaha and pawar at ausa | Sarkarnama

अमित शहाच्या सभेने औसा झाले भाजपमय

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने औसा विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेत आहे. शिवसेनेचा दावा आणि भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी असताना पवार यांनी उमेदवारी मिळवत पहिली लढाई जिंकल्याची चर्चा आहे. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्लारी येथील सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता औसा भाजपमय झाल्याचे चित्र आहे. किल्लारीतील सभा यशस्वी झाल्यानंतर शहा यांनी पवार यांचे कौतुकही केले. 

निलंग्यात निलंगेकर, लातूरमध्ये देशमुख असे नेतृत्व राहिले आहे. औशाला मात्र आतापर्यंत खंबीर असे नेतृत्व मिळाले नाही. अभिमन्यू पवार यांनी गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सहायक राहिल्याने मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. त्यामुळे मतदारसंघासाठी अनेक योजना पदरात पाडून घेण्यात पवार यांना यश मिळाले. कोट्यावधींचा निधी आल्याने मतदारसंघाचे चित्र पालटण्यास सुरूवात झाली. 

गेल्या दहा- पंधरा वर्षात जेवढा विकास झाला नाही त्या पेक्षा कितीतरी पटीने विकासकामे सुरु असल्याचे बोलले जाते. विकासाच्या योजना येवू लागल्याने मतदारसंघातील लोकही पवारांकडे आशेने पाहू लागले आहेत. भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली, पण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे अडचण होती. शिवाय भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी देखील बरीच होती. पण या सगळ्यावर मात करत पवार यांनी मतदारसंघ तर सोडवून घेतलाच व उमेदवारीही मिळवली. 

शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांची नाराजी दूर करण्यातही त्यांना यश आले. मानेंची साथ मिळाल्याने पवारांचे पाठबळ वाढल्याचे दिसते. मतदारसंघातील वातावरण अधिक भक्कम करण्यात अमित शहा यांच्या सभेने देखील भर टाकली. त्यामुळे औसा मतदारसंघ भाजप मोठ्या मताधिक्‍याने जिंकेल असा दावा केला जातोय. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख