पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घराघरात पोहचवा - अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घराघरात पोहचवा - अमित शहा

सावरगाव : काश्‍मीरचे वेगळे अस्तित्व राखणारे 370 कलम रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश अखंड केला व 70 वर्ष रखडलेले काम केले, त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी मोदी यांनी ओबीसी आयोगाची स्थापना केली, मोदी यांनी शंभर दिवसात केलेल्या गोष्टी घराघरामध्ये पोहचवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भगवानबाबा यांचे स्मारक उभे करून पुढची अनेक वर्षे भगवानबाबा लोकांच्या स्मरणात राहतील असे काम पंकजाताई यांनी केले आहे, त्यांनी केलेल हे काम वंचित समाजाला अभिमानास्पद आहे असे सांगून त्यांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. 

उसतोडणी कामगारांच्या आयुष्यात सुख आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर कष्ट घेतले, शिक्षण घ्या आणि उन्नती करा, हा भगवानबाबांचा संदेश त्यांनी प्रत्यक्षात आणला. या समाजाच्या हितासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, ओबीसी समाजाच्या भल्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले आणि त्यांचे काम पंकजाताई पुढे नेत आहेत अशा शब्दांत शहा यांनी पंकजा मुंडे यांची पुन्हा एकदा मुक्तकंठाने प्रशंसा केली. 

सावरगाव येथील मेळाव्याला शहा यांनी उपस्थिती लावून पंकजा मुंडे यांना एकप्रकारे बळच दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या मेळाव्यात 370 तोफाची सलामी देण्यात आले तसेच त्यांचे 370 तिरंगी झेंड्यांनी स्वागत करण्यात आले. त्यांना फेटा बांधून व ज्ञानेश्‍वराची प्रत देऊन राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा ताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी यावेळी त्यांना भगवानबाबांची मुर्तीही देण्यात आली. शहा आधी औरंगाबादबादला आले त्यानंतर ते आणि पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सावरगाव येथे आले. पंकजा ताई मुंडे यांनी गेल्या दोन वर्षापासून सावरगाव येथे दसरा मेळावा सुरू केला आहे. आजच्या मेळाव्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री राम शिंदे आणि जयदत्त क्षीरसागर तसेच माजी खासदार आणि छत्रपती उदयनराजे तसेच खासदार ओमराजे निंबाळकर आदी मान्यवरव यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com