amit shaha and congress party | Sarkarnama

गांधी घराण्याकरता एसपीजी सुरक्षेसाठीच कॉंग्रेसचा हट्ट का - अमित शहा

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

प्रियांका गांधी - वाड्रा यांची एसपीजी सुरक्षा हटविल्यानंतर 25 नोव्हेंबरला त्यांच्या घरात घुसखोरी झाल्याबाबत विस्ताराने सांगितले. ते म्हणाले की त्यांच्या घरात केवळ गांधी घराण्याचे तिघे, रॉबर्ट वाड्रा व त्यांची मुलेच थेट जाऊ शकतात. त्या दिवशी सुरक्षा यंत्रणेला सूचना मिळाली होती की राहूल गांधी काळ्या रंगाच्या सफारीतून येत आहेत. त्याच वेळी एक काळी गाडी आली व ती आत गेली. त्यात कॉग्रेसच्या नेत्या शारदा त्यागी होत्या.या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असून तीन सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित करण्या आलेले आहे. 

नवी दिल्ली : एसपीजी सुरक्षाकवच कोणासाठी स्टेटस सिंबॉल ठरत नाही. एका विशिष्ट घराण्याची ही सुरक्षा काढली पण त्यांना तेवढ्याच सुरक्षा कवचाची व भक्कम दुसरी सुरक्षा प्रणाली पुरविली आहे. गांधी घराण्यासाठी एसपीजी सुरक्षेवरच कॉंग्रेसचा हट्ट का आहे , असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केला तेव्हा चिडलेल्या कॉंग्रेसजनानी गोंधळ केला. बहुुर्चित एसपीजी कायदा दुरूस्ती विधेयकाला लोकसभे पाठोपाठ राज्यसभेनेही आज मंजुरी दिली. 

यावेळी चर्चेला उत्तर देताना शहा यांचे कॉंग्रेस तसेच केरळात संघ भाजपच्या किमान सव्वाशे कार्यकर्त्यांच्या नृशंस हत्येवरून डाव्या खासदारांशी तीव्र वादविवाद झाले. अखेरीस दोन्ही पक्षांनी विधेयकाच्या मंजुरीवेळी सभात्यागाचे अस्त्र उपसले. शहा यांनी सांगितले की आता फक्त पंतप्रधान व त्यांच्या अगदी सजवळच्या नातेवाईकांनाच एसपीजी सुरक्षा मिळेल. ते पुढे म्हणाले माजी पंतप्रधानांना या कायदा दुरूस्तीनंतर ही सुरक्षा पदावरून पायउतार झाल्यावर पाच वर्षांनंतर मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भविष्यात त्याला अपवाद नसतील. मुद्दा हा की डॉ. मनमोहनसिंग यांची एसपीजी सुरक्षा हटविली तेव्हा कॉंग्रेसला इतका राग आला नव्हता जेवढा घराण्याची सुरक्षा काढल्यावर आला. भाजपचा विरोध घराण्याला नसून घराणेशाहीला आहे व आम्ही तो कायम करतच राहू असे सांगितले. 

ते म्हणाले की गांधी घराण्याला जी झेड प्लस ही नवी सुरक्षा दिली आहे ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री व गृहमंत्र्यांनाही पुरविली जात आहे. यांना एसपीजीच हवेत हा हट्ट का हे विधेयक गांधी घराण्याबद्दलच्या रागातून किंवा त्या तिघांना डोळ्यासमोर ठेवून आणल्याचा आरोप शहा यांनी फेटाळला. याबाबत विरोधी पक्ष, जनता व माध्यमांतही काही गैरसमज आहेत असे सांगून ते म्हणाले की या विधेयकाचा व या घराण्याचा काही संबंध नाही. सरकारमध्ये नेते, पक्ष, लोकप्रतीनिधी बदलतात पण गुप्तवार्ता विभाग- आयबी तोच असतो. जेव्हा इशारे होतात तेव्हा त्यांनाही बदलवावे लागते. पण आम्ही सरकारच्या बाहेर राहून इशारे करणाऱयांपैकी नाहीत. 

गांधी घराण्याला केवळ स्टेटस सिंबॉल म्हणून एसपीजी सुरक्षा दिली जात होती. हा कायदा चारवेळा दुरूस्त करण्यात आला. ही पाचवी दुरूस्ती आहे व केवळ तीच दुरूस्ती घराण्याला केंद्रस्थानी मानून केली गेलेली नाही. राममंदिर आंदोलनावेळी विहिंप नेते अशोक सिंघल यांना तत्कालीन पंतप्रधानांपेक्षा जास्त धोका होता पण त्यांना एसपीजी सुरक्षा मिळाली नाही कारण ती फक्त पंतप्रधानांसाठीच आहे व असली पाहिजे. गांधी घराणेच नव्हे तर देशातील 130 कोटी नागरिकांच्याही सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. शहा म्हणाले की एसपीजीच्या ताफ्यात 33 टटक्के जवान बीएसएफचे, 33 ते 34 टक्के सीआरपीएफचे, 17 टक्के सीआयएसएफचे, 9 टक्के आयटीबीपीचे व अन्य राज्यांच्या पोलिस दलाचे एक टक्का जवान असतात. त्यांचे रीतसर प्रशिक्षण केले जाते. दर पाच वर्षांनी त्यांना बदलले जाते. राजीव गांधी याना पर्यायी सुरक्षा न देताच त्यांची एसपीजी काढल्याचा ठपका वर्मा आयोगाने ठेवला होता. आम्ही तसे केलेले नाही. 

प्रियांका गांधींच्या घरात कॉंग्रेसच्याच नेत्याची घुसखोरी... 
शहा यांनी प्रियांका गांधी - वाड्रा यांची एसपीजी सुरक्षा हटविल्यानंतर 25 नोव्हेंबरला त्यांच्या घरात घुसखोरी झाल्याबाबत विस्ताराने सांगितले. ते म्हणाले की त्यांच्या घरात केवळ गांधी घराण्याचे तिघे, रॉबर्ट वाड्रा व त्यांची मुलेच थेट जाऊ शकतात. त्या दिवशी सुरक्षा यंत्रणेला सूचना मिळाली होती की राहूल गांधी काळ्या रंगाच्या सफारीतून येत आहेत. त्याच वेळी एक काळी गाडी आली व ती आत गेली. त्यात कॉग्रेसच्या नेत्या शारदा त्यागी होत्या.या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असून तीन सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित करण्या आलेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख