amit shah will be call udhav thackrey to form government | Sarkarnama

 उद्धव ठाकरेंना अमितभाईंचा फोन आला तर महायुतीचे सरकार बनेल ? 

उमेश घोंगडे 
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे : राम मंदिर प्रकरणाचा निकाल आल्यानंतर आज दिवसभर राज्यातील सत्ता स्थापनेची चर्चा थंड झाली होती. मात्र, सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याने राजकीय घडामोडींना सायंकाळी वेग आला. 

उद्या भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला तर लगेचच महायुतीचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. 

हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत घेतलेली भूमिका पाहता राज्याच्या पातळीवर आता चर्चा होणे शक्‍य नाही. त्यामुळे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ऐनवेळी हस्तक्षेप करून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली तर महायुतीचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. 

शहा यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करताना त्यांचा अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा व इतर पदांच्या समान वाटणीचा फॉर्म्युला मान्य केला तर उद्धव ठाकरे यांच्याकडून होकार मिळू शकतो. मात्र, त्यातही पहिली अडीच वर्षे कुणाची यावर मतभेद होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या वक्तव्यावरून पहिली अडीच वर्षे कुणाची यावर उद्धव ठाकरे तडजोड करू शकतात, असे दिसते. मात्र, हे सारे घडायचे असेल तर अमित शहा यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. अमित शहा असा पुढाकार घेतील का याबाबत मात्र शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख