अमित शहा भेटीला हा मातोश्रीचा मोठा विजय ? 

अमित शहा भेटीला हा मातोश्रीचा मोठा विजय ? 

मुंबई ः भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीदरम्यान केंद्रात महत्त्वाचे खाते द्या, अशी मागणी शिवसेना करणार असून नाणार प्रकल्प रद्द करा असेही सांगितले जाणार असल्याचे समजते. संपर्क अभियानाअंतर्गत अमित शहा यांनी भेटीला येणे हा मातोश्रीचा मोठा विजय मानला जातो आहे. 

मोदी लाट ओसरल्यामुळे शहा भेटीला येत असल्याचे खा. संजय राऊत यांनी नमूद केले आहे. तर आता आमची गरज असल्याने आम्ही मागण्या करू, त्या मान्य होतील अशी अपेक्षा शिवसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या भेटीत अमित शहा काय म्हणतात ते अधी बघू या, अशी सावध भूमिका सेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी घेतली असताना अन्य नेत्यांनी मात्र मागण्या काय असाव्या त्याचे कोष्टक तयार केले आहे. गीते यांचे खाते बदला, चांगले खाते द्या, अशी एक मागणी आहे. 

त्याचवेळी भाजपने दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी चालवली असून त्यात सेनेला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद दिले जाईल, असे सांगितले जाते आहे. याला दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करा, अशी मागणी करणारे पत्र मुख्य फडवणीस यांना दिले आहे. या प्रकल्पाला सेनेचा प्रारंभापासून विरोध आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com