Amit Shah targets NCP and congress in Karad | Sarkarnama

सिंचनावर 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले : अमित शहा

सरकारनामा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

सिंचनासाठी 70 हजार कोटी रूपये खर्च केल्याचे अजित दादा सांगत  आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार खर्च केले  मग पाणी कुठे गेले? 

सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रूपये खर्च केल्याचे अजित पवार  सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार  खर्च केले तर  मग पाणी कुठे गेले?  असा टोला केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा लगावला. 

भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार अतुल भोसले व लोकसभेचे उमेदवार उदयनराजे  भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडला झालेल्या जाहिर सभेत श्री. शहा बोलत होते.  त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टिका केली. सुरवातीला उदयनराजे  भोसले यांनी अमित शहा यांना तलवार भेट देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी  उदयनराजे, अतुलबाबा आणि मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या.  

  अमित शाह म्हणाले , पाच वर्षात सातारा जिल्ह्यात 48 हजार हेक्‍टर  सिंचनाखाली आणले. सिंचनासाठी 70 हजार कोटी रूपये खर्च केल्याचे अजित दादा सांगत  आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार खर्च केले  मग पाणी कुठे गेले?  कृष्णा खोऱ्याची कामे 15 वर्षांपासून बंद होती, आता भाजपचे  सरकार आले आणि या कामांना सुरवात झाली. कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन  बंद पाडली. हीच कामे आता भाजपचे सरकार पूर्ण करणार आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी 34  प्रकल्पांची कामे केंद्राच्या मदतीने  सुरू केली आहेत.  गेली दहा वर्षे केंद्रात आघाडी सरकार होते. शरद पवारांना मी विचारतो, आपण  महाराष्ट्रासाठी काय केले?  पृथ्वीराज चव्हाण तुमच्याकडे मते मागण्यासाठी आले तर  विचारा केंद्रात काम करत होता मग हा भाग विकासापासून वंचित का राहिला. एका बाजूला  आघाडीची 15 वर्षे आणि दुसऱ्या बाजूला भाजपची पाच वर्षे अशी तुलना केल्या आमच्या  पक्षाने मोठ्याप्रमाणे कामे केली आहेत,  कॉंग्रेसने तर जवानांच्या सदनिका विकून  पैसे खाल्ले. शरद पवारांना मी चॅलेंज देतो, आमच्या मुख्यमंत्री व पंतप्रधानांवर  एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागू शकत नाही, इतके ते प्रामाणिक आहेत. असेही ते म्हणाले . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख