Home Minister Amit Shah
Home Minister Amit Shah

मिशन  काश्मीर : भाजपची जनसंपर्क मोहीम सुरू; अमित  शहा भेटले जगमोहन यांना

मोदी सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यावर त्या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासीयांना समाजी यासाठी पंतप्रधान मोदींच्या कल्पनेतून सुरू झालेले देशपातळीवरील महिनाभराची जनसंपर्क मोहीम आजपासून सुरू झाली. पक्षआधअयक्ष अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी या निर्णयाबद्दल चर्चा केली.

नवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यावर त्या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासीयांना समाजी यासाठी पंतप्रधान मोदींच्या कल्पनेतून सुरू झालेले देशपातळीवरील महिनाभराची जनसंपर्क मोहीम आजपासून सुरू झाली. पक्षआधअयक्ष अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी या निर्णयाबद्दल चर्चा केली.

जगमोहन सध्या 91 वर्षांचे असून त्यांची प्रकृती वयोमानानुसार बरी नाही. त्यामुळे ते फारसे घराबाहेर पडत नाहीत. वाजपेयी सरकारच्या काळआत जम्मू काश्मीरचे राज्यपालपद सांभाळलेले जगमोहन काश्मीर समस्येवरील जाणकार मानले जातात. त्यांनी राज्यपाल असताना काश्मीरमधील भारताचा निधी व केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था घेऊन पाकशी संधान साधणाऱ्या फुटीरतावाद्यांना वेसण घातली होती. कलम 370 बाबत देशभरात जनजागृती करून विशेषतः बुध्दिजीवी वर्गाला या निर्णयाचे फायदे पटवून देण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या मोहीमेत शहा यांनी आज जगमोहन यांची भट घेऊन सुरवात केली. 

कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हेही उपस्थित होते. यानंतर पक्षाचे पदाधिकारी, आमदार-खासदार, केंद्र व राज्यांचे मंत्री देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात व ग्रामीण भागात जाऊन जनजागरण करतील.यासाठी मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेतृत्वाने समित्या नेमल्या आहेत.

अमित शहा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com