अमितभाय यांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर गुजराती, मराठी पदार्थांसह सूप 

अमितभाय यांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर गुजराती, मराठी पदार्थांसह सूप 

मुंबई : शिवसेना-भाजपचं घोडं अखेर काही वेळातच गंगेत न्हाणार आहे. गेल्या चार वर्षापासून भाजपवर सातत्याने प्रहार करणारी शिवसेना अखेर युतीसाठी तयार झाली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पाहुणाचारासाठी मातोश्री बंगल्यावर जोरदार तयारी सुरू आहे. अमितभायंसाठी महाराष्ट्रीयन पदार्थांसह सूप देखील मागविण्यात आले आहे. 

ट्रायडंट हॉटेल मधून शाह यांना आवडणारे खाद्य पदार्थ मागविण्यात आले असून त्यासाठी शिवसेनेची एक टीमही कामाला लागल्याचे समजते. अमितभायना सूप कमालीचे आवडते. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत ही जोडगोळी भाजपवर चौफेर टीका करीत होती. या दोघांच्या टीकेने भाजप पार घायाळ झाला होता. शिवसेनेलाही भाजपे उत्तर दिले. पण, 2019 मध्ये जुना मित्र सोबतीला लागणार. संकटात तोच धाऊन येईल असे मनाला सतत वाटत असल्याने भाजपने थोडे नरमाईनेच घेतले त्याचा अखेर गोड होत आहे. संध्याकाळपर्यत युतीची घोषणा होणे अपेक्षित आहे. 

अमित शहा यांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर तयारी सुरू असून शिवसेना-भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेतेही येथे दाखल होणार आहेत. गेल्यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बंद दरवाजा आड चर्चा झाली होती. आज तशी चर्चा होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
युती झाल्याने दोन्ही पक्षांच्या खासदार, आमदारांचे चेहरेही आनंदाने फुलले आहेत. 

चोरावर मोर आहे : नवाब मलिक 
दरम्यान, शिवसेना-भाजप एकत्र असल्याचे चिन्ह दिसत असल्याने विरोधकांनी युतीवर टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलित यांनी म्हटले आहेत की उद्धव ठाकरे हे चौकीदार चोर है म्हणत होते आता युती करणारी शिवसेना म्हणेल,"" चोरावर मोर आहे.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com