अमित शाह यांच्या 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी दीक्षित! 

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचा बहुचर्चित मुंबई दौरा उद्या (ता. 6) होत आहे. सेना- भाजपमधील तणाव टोकाला गेलेला असताना शाह "मातोश्री'वर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितला भेटण्याचे शाह यांचे नियोजन आहे.
अमित शाह यांच्या 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी दीक्षित! 

पुणे: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचा बहुचर्चित मुंबई दौरा उद्या (ता. 6) होत आहे. सेना- भाजपमधील तणाव टोकाला गेलेला असताना शाह "मातोश्री'वर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितला भेटण्याचे शाह यांचे नियोजन आहे. 

पालघर पोटनिवडणुकीनंतर युती तुटणार, अशी हवा निर्माण झाली आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे घोषित केले आहे. तर भाजपने स्वबळाची तयारी करत शिवसेनेशी युतीची इच्छा जाहीर केली आहे. पुर्वीच्या तुलनेत भाजप नेते सहमतीची भाषा बोलत आहेत. यापार्श्‍वभूमीवर अमित शाह बुधवारी उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत. या भेटीत महत्त्वपुर्ण चर्चा अपेक्षित आहेत. 

भाजपने मात्र ही भेट विशेष नसल्याचे म्हटले आहे. "समर्थन के लिए संपर्क' या अभियानाचा भाग म्हणून, तसेच एनडीएचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना शाह भेटत असल्याचे भाजप प्रवक्‍तांनी सांगितले आहे. राजकारण आणि राजकारणाबाहेरील व्यक्‍तींना शाह भेटत आहेत. नुकतीच त्यांनी माजी क्रिक्रेटपटू कपील देव यांची भेट घेतली. बुधवारी ते अभिनेत्री माधुरी दिक्षीतलाही भेटणार आहेत, असे भाजपने स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com