Amit Shah to address BJP Maharashtra Core Committee Meeting | Sarkarnama

....तर भाजप बसणार विरोधी बाकांवर? अमित शहा घेणार निर्णय

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावले असले तरीही भाजपने आपली भूमीका ठरवलेली नाही. जर शिवसेना सरकार स्थापणार असेल तर भाजप विरोधी बाकांवर बसेल, अशी भूमीका या पक्षाने घेतली आहे. काही वेळातच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई : राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावले असले तरीही भाजपने आपली भूमीका ठरवलेली नाही. जर शिवसेना सरकार स्थापणार असेल तर भाजप विरोधी बाकांवर बसेल, अशी भूमीका या पक्षाने घेतली आहे. काही वेळातच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा खेळ सुरुच आहे. भाजपला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावले असले तरीही शिवसेनेने आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही. काही वेळापूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची भेट घेतली. आता पालखीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असे त्यांनी स्पष्ट केले. 

दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काही वेळापूर्वी झाली. त्यात अंतीम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा बैठक होत असून त्यातील निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर शहा याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख