amit shah | Sarkarnama

अमित शाह यांच्या उपस्थित ठाण्यात सावरकर संमेलन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई : ठाणे येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उपस्थित राहणार आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असताना शाह यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 29 वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाजपचे अन्य मंत्री उपस्थित राहणार नसले तरी शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. हे संमेलन तीन दिवसाचे असून उद्या दुपारी 3.50 वाजता गडकरी रंगायतन येथे उद्‌घाटन होणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख