भाजपचे जिल्हाध्यक्षपद न मिळाल्यने अमित कदम राष्ट्रवादीच्या वाटेवर 

सोमवारीभाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी विक्रम पावसकर यांची निवड झाली.
amit kadam will join ncp
amit kadam will join ncp

सातारा : भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी विक्रम पावसकर यांची फेरनिवड झाली. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेले अमित कदम यांचे समर्थक नाराज झाले आहेत. या नाराजीतून अमित कदमांनी राष्ट्रवादीत पुन्हा जावे असा आग्रह समर्थकांनी धरला आहे.

तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी अमित कदम कुसुंबी गटातून त्यांच्या पत्नीसाठी राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादीकडून तिकीट तर लांबच पण सर्वच प्रक्रियेतून त्यांना दुर्लक्षित केले. या दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व अमित कदम यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. शेवटी अमित कदम यांनी जिल्ह्यात सर्वात अगोदर भाजपचा रस्ता धरला. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी होती. खुद्द माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपवासी झाले. उदयनराजे भोसले यांचा वरदहस्त कायम अमित कदम यांच्या पाठीशी असल्याने त्यांनी ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत जुळवून घेतले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या साक्षीने अमित कदम यांना पक्षात चांगली जबाबदारी देण्याचे ठरले होते. विधानसभा निवडणुकीत अमित कदम यांनी आपल्या कार्यक्षेत्रात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मताधिक्‍यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांचा पूर्वीचा जिल्हा परिषद गट असलेल्या कुसुंबी गटात दोन्ही राजांना चांगले मताधिक्‍य मिळाले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे व ज्ञानदेव रांजणे यांचेही योगदान मोठे राहिले.

राज्यात भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्याने बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीकडे पुन्हा जुनी मंडळी आकर्षित होऊ लागली आहे. त्यातच भाजपाकडून सातत्याने अवहेलना व डावलण्याची भूमिका घेतली जात असल्याने अमित कदम त्यांचे समर्थक नाराज होऊन पुन्हा स्वगृहाकडे (राष्ट्रवादीकडे) परतण्याचा आग्रह धरू लागल्याने जावलीत पुन्हा नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत.
 
अमित कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्ष सत्तेत असताना ही पक्षाकडे कधीही महामंडळ किंवा विधान परिषद अशी पदे मागितली नाहीत. तर साधे पक्ष संघटनेत सामावून घेऊन एखादे पद मिळण्याची अपेक्षा होती. पण शब्द देऊनही तो पाळला जात नसेल तर मग करायचे काय? माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ही विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप घेऊन त्यांना खाली खेचा असे जाहीर सांगूनही त्यांचा भूमिकेकडे ही पक्ष दुर्लक्ष करत असेल तर आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधीच न्याय मिळणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com