`अमित देशमुख यांच्यात मुख्यमंत्रिपदाची क्षमता`

....
balasaheb-thorat-amit-deshmukh
balasaheb-thorat-amit-deshmukh

लातूर ः लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा होत असलेला नागरी सत्कार हा नव्या युगाचा प्रारंभ आहे. महाराष्ट्रासाठी हा दिवस महत्वाचा आहे. श्री. देशमुख यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे परंपराही आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच याची तयारी करावी, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे व्यक्त केले.

राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षणमंत्री झाले. या निमित्ताने रविवारी (ता. २६)  त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री दिलीपराव देशमुख होते. श्री. देशमुख आणि श्री. थोरात यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना श्री. थोरात यांच्याकडे लातूरचे पालकत्व होते. याची उतराई श्री. थोरात करू पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ देखील श्री. थोरात यांनी काँग्रेसचे सरकार आले तर अमित देशमुख मुख्यमंत्री असतील असे जाहिर भाषणात सांगितले होते. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यात श्री. देशमुख यांना वैद्यकीय शिक्षणमंत्रीपद मिळाले.

नागरी सत्काराला श्री. थोरातच प्रमुख पाहुणे होते. त्यांच्याच हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. आजचा कार्यक्रम हा नव्या युगाचा प्रारंभ आहे. लातूर व महाराष्ट्रासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. गेल्या वेळेस श्री. देशमुख यांना उशिराने राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्याच वेळेस त्यांना कॅबिनेट मिळणे अपेक्षित होते. पण त्या वेळेस मी करु शकलो नाही. आता मात्र कॅबिनेट केले. श्री. देशमुख यांच्या मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. जवळ परंपरा आहे. महाराष्ट्रासोबतच त्यांनी देशातही चांगले काम करावे, असे श्री. थोरात म्हणाले. तर श्री. देशमुख यांनी आपल्या भाषणात श्री. थोरात यांच्यामुळे मला मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com