विजयाच्या हॅटट्रीकनंतर अमित देशमुखांना मंत्रिपद

महाराष्ट्रात राजकीय घराण्यापैकी एक महत्वाचे घराणे म्हणजे लातूरचे देशमुख घराणे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून गेली तीस चाळीस वर्ष हे घराणे सातत्याने सत्तेत राहिले आहे. विलासराव देशमुख यांनी तर राज्यात दोन वेळेस मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार अमित देशमुख हे समर्थपणे पुढे नेत आहेत. राज्यात काँग्रेस पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
Amit deshmukh gets ministership after hattrick of winning in assembly elction
Amit deshmukh gets ministership after hattrick of winning in assembly elction

लातूर ः महाराष्ट्रात राजकीय घराण्यापैकी एक महत्वाचे घराणे म्हणजे लातूरचे देशमुख घराणे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून गेली तीस चाळीस वर्ष हे घराणे सातत्याने सत्तेत राहिले आहे. विलासराव देशमुख यांनी तर राज्यात दोन वेळेस मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार अमित देशमुख हे समर्थपणे पुढे नेत आहेत. राज्यात काँग्रेस पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार देशमुख यांनी विजयाची हॅटट्रीक साधली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागली. कॅबिनेट मंत्री म्हणून श्री. देशमुख शपथ घेतली. श्री. अमित देशमुख यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून घरातूनच मिळाले आहे. वडिल लोकनेते विलासराव देशमुख यांच्याकडे पाहत श्री. देशमुख राजकारणात आले. शिक्षणाने अभियंते असलेल्या श्री. देशमुख यांनी वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणात उडी घेतली. १९९७ मध्ये लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात ते  सक्रीय सहभाग घेतला. त्यावेळेसपासून त्यांची राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. २००२ ते २००८ या कालावधीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्षही राहिले. १९९९ ते २००८ हा विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ तर त्यांनी जवळून पाहिला. राज्याचे व देशाचे राजकारण त्यांनी जवळून पाहिले.

२००९ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाचे दोन मतदारसंघ झाले. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे हे दोन मतदारसंघ. यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख यांनी पहिल्यांदा लातूर शहर विधानसभा निवडणूक लढवली.  या निवडणुकीत त्यांनी बसपाचे डॉ. खय्युम खान यांचा सुमारे ९० हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे शैलेश लाहोटी यांचा सुमारे ४९ हजार मतांनी पराभव केला. परवाच्या २०१९ च्या निवडणुकीत श्री. देशमुख यांचा भारतीय जनता पक्षाचे शैलेश लाहोटी यांच्याशी पुन्हा सामना झाला. यात त्यांनी ४० हजारा पेक्षा जास्त मताधिक्य घेत लाहोटी यांचा पराभव तर केलाच पण विजयाची हॅटट्रकीही साधली.

इतकेच नव्हे तर राज्यात या निवडणुकीतही भाजपचेच वर्चस्व राहिले असे वातावरण होते. असे असताना त्यांनी आपले कनिष्ठ बंधू धीरज देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आणली इतकेच नव्हे तर लाखाच्या मताधिक्याने विजयीही केले. एकाच विधानसभेत दोन सख्खे भाऊ आमदार होणे हा एक इतिहासच ठरला.

विलासराव देशमुख यांचे २०१२ मध्ये निधन झाले. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. यावेळी श्री. देशमुख यांना तातडीने मंत्रीपदी घेतले जाईल असे लातूरकरांना वाटत होते. पण दीड दोन वर्ष त्यांना मंत्री होण्यासाठी वाट पहावी लागली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर त्यांना राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये घेण्यात आले. त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन अशी खाती त्यांना देण्यात आली होती.

एकीकडे राजकारणात आपली पकड निर्माण करीत असताना श्री. देशमुख यांनी सहकार क्षेत्रातही लक्षणीय काम केले आहे. मांजरा, विकास, रेणा साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या क्षेत्रात मराठवाड्यात तर आदर्श निर्माण केलाच पण लातूरची पश्चिम महाराष्ट्रालाही त्यांनी दखल घ्यायला लावली आहे. पक्षातही ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम करीत आहेत. गोवा राज्याचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. तरुण नेतृत्व म्हणून पक्ष त्यांच्याकडे पाहत आहे.  यातूनतच त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  मंत्रीमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर लातूरकरांनी जल्लोष केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com