अमित देशमुख यांनी मदतीसाठी जाहीर केले तब्बल १९ मोबाईल  क्रमांक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लाॅकडाऊन मुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांकरीता पालकमंत्री अमित देशमुख यांनी तब्बल १९ मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत
Amit Deshmukh Announced Ninteen Phone Numbers for Emergency
Amit Deshmukh Announced Ninteen Phone Numbers for Emergency

लातूर  : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लाॅकडाउन करण्यात आले आहे. कोरोना पासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लातूर जिल्ह्यातील जनतेकडूनही या कामी मोलाचे सहकार्य मिळत आहे . आगामी काही दिवस अशाच प्रकारे धैर्य आणि संयम दाखवून समाजातील सर्वच घटकांनी उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे. अपवादाने एखादी कठीण परिस्थिती  उद्भवल्यास  तातडीने मदत मिळवण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा,'' असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांनी केले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तू ,औषधे व इतर काही गोष्टी मिळाव्यात म्हणून प्रशासन दक्ष राहून काळजी घेत आहे. वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे काही लोकांची  गैरसोय झाली आहे. तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी आहे त्याच ठिकाणी थांबून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. एकाही नागरिकाला कोणतीही अडचण येणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची सर्वतोपरी काळजी शासनाने घेतली आहे. तरी अपवादाने एखादी गंभीर परिस्थिती उद्भवली तर माझे कार्यालय मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे,'' असे अमित देशमुख यांनी कळवले आहे. 

कठीण परिस्थितीत नागरिकांनी माझे खाजगी सचिव किसन जावळे ९०११०१६९९९ विशेष कार्य अधिकारी रविकिरण जोशी ९८६९२०३४१८, संजय जाधव ९९६०१२७१११, श्रीकांत सोनवणे ९३२५२२२२२२, मधुकर गुंजकार ९९२१०८९९११, सहाय्यक विनायक निकम ९८६७७९८१४२, मनोज कांबळे ८४२५९०३१३१, काकासाहेब लहाडे,९८६७४९५३४३, तसेच लातूर  शहर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी पांडुरंग कोळगे ९४०४४२७५०३, सहाय्यक सुजित देशपांडे ९४२३६१७२४३, राजकुमार भोसले,९४२००० ४००२, संतोष गडदे ७५८८६११४८१, राहुल इंगळे ९८९०५७७१२८, संजय माने ८००७७७१५५५,अमोल देशमुख ९९६०४७२१८५, गोविंद जोशी ९४२२३३००००,  रियाज सय्यद ९६०४४८३३३३, सचिन खोसे ९७६८००१६२८ आणि दीपक पाटील ९०९६६७७७८० यांच्याशी संपर्क साधावा. आपली अडचण दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी बोलून निश्चित असे प्रयत्न केले जातील, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com