भारताची वाघीण सुनंदा वशिष्ठची अमेरिकेत घुमली गर्जना ...

भारताची वाघीण सुनंदा वशिष्ठची अमेरिकेत घुमली गर्जना ...

पुणे : भारतात मानवाधिकाराबाबात जरा काही खुट्ट झाले की त्यावर अमेरिकेतल्या काही संघटना लगेच आक्षेप घेतात, पत्रके काढतात. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी एका संघटनेने घेतलेल्या एका चर्चासत्रात भारतातील एक राजकीय विश्‍लेषक आणि लेखिका सुनंदा वशिष्ठ हिने ज्या पद्धतीने भारतीची बाजू मांडली व ज्या आक्रमक पद्धतीने तिने पाकिस्तानच्या प्रतिनिधींना प्रत्युत्तर दिले त्यामुळे ती आज सोशल मिडीयावर सर्वाधिक जागा मिळवून आहे. 

अमेरिकेतील प्रतिनिधीगृहातील काही सदस्यांच्यावतीने मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एक जनसुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये काश्‍मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याबद्दल पाकिस्तानी प्रतिनिंधींनी भारताबद्दल चुकीची माहिती दिली. मग सुनंदा वशिष्ठ यांनी भारताची बाजू जोरदार पद्धतीने मांडताना काश्‍मीरमध्ये कुठल्याही प्रकारे मानवी अधिकाराचे उल्लंघन होत नसल्याचा दावा केला. पाकिस्तानची बाजू घेऊन काश्‍मीरमध्ये मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करणाऱ्या मंडळींना तिने थेट सवाल केला की मानव अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करणारी ही मंडळी जेव्हा काश्‍मीरमध्ये काश्‍मीरी पंडितांना हाकलले जात होते तेव्हा ही सगळी मंडळी कुठे होती. 

"आयएसआयएस' म्हणजे इस्लामिक स्टेटचे कौर्य आणि त्यांच्या अत्यंत हिंसक कारवाया जगाला आज माहित झाल्या पण यापेक्षा अत्यंत भयानक कारवाया काश्‍मीरमध्ये काश्‍मिरी पंडितांबाबतीत घडल्या आहेत. 1990च्या जानेवारी महिन्यात एके दिवशी तिथल्या म्हणजे काश्‍मीरमधल्या मशिदीमधून अशा घोषणा झाल्या की आम्हाला काश्‍मीरमध्ये हिंदू महिला हव्या आहेत पण हिंदू पुरुष नको आहेत, त्या रात्री माझे आजोबा मला आणि माझ्या आईला मारून टाकायच्या तयारीत होते. आम्ही अतिरेक्‍यांच्या तावडीत सापडू नये यासाठी असे टोकाचे पाऊल उचलायच्या तयारीत ते होते. अतिरेक्‍यांनी तेव्हा आमच्यासमोर तीनच पर्याय ठेवले होते एक तर काश्‍मीर खोरे सोडून जावा किंवा धर्म बदला नाहीतर मृत्युला सामोरे जा असे तीन पर्याय अतिरेक्‍यांनी आमच्यासमोर ठेवले होते. सुनंदा वशिष्ठ यांनी हे सगळे सांगून अत्यंत धारदार शब्दांत विचारले की चार लाख काश्‍मीरी हिंदूना काश्‍मीर सोडावे लागले पण त्यांच्या मदतीला आजतागायत कुणी आले नाही गेल्या तीस वर्षात आम्हाला काश्‍मीर खोऱ्यात परत येता आलेले नाही. सुनंदा वशिष्ठ यांना त्यांची बाजू मांडत असताना अमेरिकन सदस्यांपैकी जे पाकिस्तानच्या बाजुने होते त्यांनी थांबवायचा तसेच त्यांच्या वक्तव्यात अडथळा आणायचा प्रयत्न केला मात्र या कुठल्याही अडथळ्यांना त्या बधल्या नाहीत. त्यांनी भारताची बाजू आक्रमक पद्धतीने आणि पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या सदस्यांच्या युक्तीवादाचा समाचार घेत मांडली आणि सगळ्यांच्या टाळ्या मिळवल्या. 

ही जनसुनावणी सध्या सोशल मिडीयावर तसेच इथल्या काही वेबसाईटवर खास शेअर केली जात आहे. वशिष्ठ सध्या नेटकरी मंडळीमध्ये लोकप्रिय झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com